HSC Board Exam 2019: मुंबई मध्ये Nishka Hosangady देणार iPad वर बारावीची परीक्षा

निष्का Dystonia या एका दुर्मिळ अनुवंशिक आजाराने पीडित आहे. तिला बोलणं आणि हाताची हालचाल करणं यामध्ये त्रास होतो.

HSC Exam with I Pad (Photo Credits: Pixabay)

MSBSHSE HSC Board Exam 2019: महाराष्ट्रात आजपासून राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. यंदा कॉपीचं प्रकरण टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ताण विरहीत परीक्षांचा सामना करता यावा याकरिता मंडळाने यंदा अधिक सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात आली आहे. मुंबईच्या सोफिया कॉलेजची निष्का होसनगडी (Nishka Hosangady) ही विद्यार्थिनी पहिल्यांदा आय पॅडचा वापर करून बारावीची परीक्षा देणार आहे. निष्का Dystonia या एका दुर्मिळ अनुवंशिक आजाराने पीडित आहे. तिला बोलणं आणि हाताची हालचाल करणं यामध्ये त्रास होतो.  10th & 12th Board Exam 2019: आजपासून सुरु होणार बारावीची परीक्षा; BEST देणार HSC च्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात मोफत प्रवास करण्याची मुभा

निष्का ही दिव्यांग मुलगी असून आयपॅडच्या मदतीने ती परीक्षा देणार आहे. यामध्ये निष्का डाव्या हाताच्या एका बोटाने आयपॅडवर उत्तर लिहेल आणि त्यानंतर तिच्यासोबतचा साथी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहणार आहे. यापूर्वी दहावीच्या परिक्षेमध्येही निष्काने अशाचप्रकारे अ‍ॅप्पल डिव्हाईसचा वापर करून परीक्षा दिली होती. वयाच्या आठव्या वर्षी निष्काला एका दुर्मिळ आजाराने गाठलं. त्यानंतर शिक्षणातील दोन वर्ष वाया गेली. पुढे स्पेशल स्कूलमध्ये प्रवेश मिळवत NIOS board माध्यमातून परिक्षा दिल्या. अकरावीला तिने सोफिया कॉलेजमध्ये आर्ट्स शाखेत प्रवेश मिळवला. यंदा 1900 विद्यार्थांना मुंबईत विशेष सोय देण्यात आली आहे. PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक

यंदा महराष्ट्रभरातून सुमारे 14 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राज्यात गैर प्रकार रोखण्यासाठी 252 भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement