मुंबईतील Gateway Of India येथील समुद्रात पडलेल्या महिलेला रेस्कू केल्याचा थरारक अनुभव फोटोग्राफरने केला शेअर
येथे सोमवारी एक महिला गेट वे ऑफ इंडिया येथील एका सेफ्टी वॉलवर बसली होती.
मुंबईतील पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सोमवारी एक महिला गेट वे ऑफ इंडिया येथील एका सेफ्टी वॉलवर बसली होती. मात्र त्यावेळी महिलेचा तोल जात ती समुद्रात पडली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे.(Mumbai Rains & Maharashtra Monsoon Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात अलर्ट, जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज)
फोटोग्राफर गुलाब चंद्र यांनी असे म्हटले की, संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास एक महिला सेफ्टी वॉलवर बसली होती. तेव्हा कोणतरी समुद्रात पडल्याचे पाहिले. त्यानंतर कॉन्स्टेबल आणि 2 महिलांना बोलावले. महिलेचा जीव वाचवण्यासाठी मी समुद्रात उडी मारली. तिला पाण्यावर तरंगणारी ट्युब घालण्यासाठी दिली आणि तिला बाहेर काढले. फक्त तिचा जीव वाचवायचा असाच विचार केला होता असे गुलाब चंद्र यांनी सांगितले.(करूळ घाटरस्ता 26 जुलैपर्यंत बंद, अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय)
Tweet:
दरम्यान, पालघर, मुंबई आणि ठाणे येथे 12-15 जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट IMD कडून जाहीर करण्यात आला आहे. तर राज्यात सक्रीय झालेला मान्सून पुढील काही दिवस कायम राहणार आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये पुढील साधारण तीन तास अती मुसळधार पाऊस पडू शकतो.