विक्रोळी येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर एक जखमी
विक्रोळी (Vikhroli) येथील पार्कसाईटच्या ठिकाणी भीषण अपघात झाला असल्याची घटना आहे.
विक्रोळी (Vikhroli) येथील पार्कसाईटच्या ठिकाणी भीषण अपघात झाला असल्याची घटना आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
धान्याने भरलेला ट्रक जात असताना त्याचा मागील बाजूचे चाक गटारामध्ये अडकले. परंतु प्रयत्न करुनही चाक गटारात अडकून राहिल्याने ट्रक पलटला. त्यावेळी घटनास्थळी पाच जण उभे असताना ते त्याखाली चिरडले गेले. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला.(हेही वाचा-Mumbai Local Horror: कुर्ला स्थानकावर मोबाईल चोराच्या हल्ल्यात धावत्या लोकल मधून पडून तरुणी जखमी; आरोपी ताब्यात)
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement