मुंबई: नायर रुग्णालयातून नवजात पाच दिवसाचे चोरीला गेलेले बाळ सापडले, महिलेला अटक

मुंबईतील (Mumbai) नायर रुग्णालयातून (Nayar Hospital) नवजात पाच दिवसाचे बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: फाइल फोटो)

मुंबईतील (Mumbai) नायर रुग्णालयातून (Nayar Hospital) नवजात पाच दिवसाचे बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी असे सांगितले आहे की, संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सात मध्ये हा प्रकार घडला आहे. मात्र बाळ आता सापडले असून चोरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

शीतल साळवी असे महिलेचे नाव आहे. शीतल ही झोपेतून उठली असता तिच्या बाजूला ठेवण्यात आलेले बाळ नव्हते. या बद्दल तिने वॉर्ड मधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता एक महिला तिच्या बॅगमध्ये बाळाला ठेवून बाहेर पडताना दिसून आली.

(मुंंबई: नाल्यांंमध्ये कचरा टाकणार्‍यांना होणार पोलिस आणि दंडात्मक कारवाई; BMC चा नवा प्लॅन)

तर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेली महिला ही जवळजवळ 40 वर्षीय आहे. तसेच महिलेच्या विरोधात आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत असला तरीही रुग्णालयात या प्रकाराने खळबळ माजली आहे.