Mumbai Fire News: दादरच्या कोहिनूर इमारतीला आग, 16 ते 17 वाहनांचे नुकसान

मुंबईतील दादर परिसरातील नामांकित कोहिनूर इमारतीच्या मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली.

Fire (PC - File Image)

Mumbai Fire News:  मुंबईतील दादर परिसरातील नामांकित कोहिनूर इमारतीच्या मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. ही आग मध्यरात्री 1च्या सुमारास लागली होती. या घटनेत 16 ते 17 गाड्या जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ही आग नेमकी कशाने लागली याचा शोध घेण्याचा काम सुरु आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात मध्यरात्री कोहिनुर इमारतीच्या पार्किंग भागात चौथ्या मजल्यावर अचनाक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आग 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या. सद्या फायर कुलिंगचं काम सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी प्रसाशन आणि अग्निशमन दलाच्या १२  गाड्या  दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानाच्या अथक प्रयत्नांनी ही आग विझवण्याचे काम केले. तब्बल एक ते दोन तास आग विझवण्यात गेले. सद्या आगीवर नियत्रंण मिळवण्यात आले असून कुलुंगचे काम सुरु आहे.

घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या संपुर्ण  जळून खाक झाल्या आहेत. ही आग कश्याने लागली याचा शोध प्रशासन घेत आहे. कंत्राटदाराकडून नियमांच ंउल्लंघन करून गाड्याची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागली असावी असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif