मुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु

त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. याच दरम्यान आता कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा वेग संथ करण्यास जरी यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही. तसेच येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. परंतु राज्य सरकारने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून तयारी करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे.(पुणे: सहकारनगर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्याने COVID19 वर यशस्वी मात केल्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले अभिनंदन)

दरम्यान, महाराष्ट्रातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. तसेच काही पोलीसांनी कोरोनावर यशस्वी सुद्धा मात केली आहे. राज्यातील एकूणच कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 2598 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. तर 698 कोरोना संक्रमितांची उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.