Mumbai Fire: अंधेरी परिसरात Peninsula Park इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून 3 जणांची सुखरूप सुटका

अंधेरी (Andheri) येथील पेन्सुसिला इमारतीच्या सहाव्या मजल्याला आज ( 14 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान आग लागली आहे.

Mumbai Fire: अंधेरी परिसरात Peninsula Park इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून 3 जणांची सुखरूप सुटका
Andheri Fire (Photo Credits: Twitter)

अंधेरी (Andheri) येथील पेन्सुसिला इमारतीच्या सहाव्या मजल्याला आज ( 14 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून 3 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरीही अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अंधेरी पश्चिमेला (Andheri West) असलेल्या वीरा देसाई मार्ग (Veera Desai Marg) परिसरात ही आग भडकल्यानंतर धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.

ANI Tweet 

आगीची दृश्य  

 

अंधेरी पश्चिमेला असलेल्या  वीरा देसाई मार्गाजवळ व्यावसायिक इमारतीला आग लागली आहे. पेन्सुसिला ही 22 मजली इमारत आहे. आगीचं वृत्त समजल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी पोहचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2019 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).