PMC Bank Crisis: 24 तासांत अजून एका बॅंक खातेदाराचा मृत्यू; मीडिया रिपोर्ट्स चा दावा
मुलुंड परिसरात या वृत्तानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
आज सकाळी संजय गुलाटी (Sanjay Gulati) यांच्यानंतर अजून एक पीएमसी बॅंकेचा खातेदार (PMC Bank Customer) हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने मृत पावल्याचं समोर आलं आहे. फट्टो पंजाबी (Fatto Punjabi) असं या मृत बॅंक खातेदाराचं नाव आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्स द्वारा देण्यात आली आहे. ही 24 तासातील दुसरी दुर्घटना आहे. पीएमसीकडून एचडीआयएलला (HDIL) कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल सध्या पोलिस स्थानकामध्ये बॅंकेतील वरिष्ठ अधिकारी विरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणी तीन जण अटकेत आहेत. पीएमसी बॅंक घोटाळा: मुंबईतील पीएमसी बॅंक ठेविदार संजय गुलाटी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोमवारी कोर्टाबाहेर केले होते निदर्शन.
मुंबई येथील एस्प्लानेड कोर्टाबाहेर काल (14 ऑक्टोबर) निषेध मोर्चा काढून पीएमसी बॅंक खातेदारांनी आपला निषेध नोंदवला होता. यावेळेस आरोपींना जामीन मिळू नये यासाठी घोषणाबाजी करण्यात आली होती. दरम्यान काही खातेदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी विनंती केली आहे. PMC बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी! आता 25 हजार ऐवजी काढता येणार 40 हजार रुपये , RBI कडून निर्णय जाहीर.
पीएमसी खातेदाराचा मृत्यू
आरबीआयने आर्थिक निर्बंध घातल्याने पीएमसी बॅंकेमधून खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं आहेत, मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार खातेदार सहा महिन्यांसाठी कमाल 40,000 रूपये बॅंक खात्यामधून काढू शकतात.