Mumbai: दोन वर्षाच्या मुलीची वडिलांकडून हत्या, आरोपीला बायकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आरोपीला पकडण्यासाठी भाईंदर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.
Mumbai: आपल्याच सख्ख्या मुलीचा गळा आवळून एका पित्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी भाईंदर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. तर मुलीच्या आईने असे म्हटले आहे की, ती जेव्हा घराबाहेर कामासाठी गेल्याने पित्याने तिचा गळा दाबून हत्या केली. याबद्दल अधिक चौकशी केली असता तर काही गोष्टींचा खुलासा झाला. त्यानुसार मुलगी सतत रडत होती आणि तिचे रडणे थांबत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या पित्याने तिचा गळा दाबला. या प्रकरणी अधिक तपास ही केला जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले की, घरात मुलगी आणि वडीलच होते. त्यावेळी मुलगी अचानक रडू लागली आणि तिला शांत बसण्यासाठी सुद्धा सांगितले. परंतु तरीही तिचे रडणे सुरुच होते. यामुळे संतप्त झालेल्या पित्याने तिचा गळा आवळला. जेव्हा मुलीची आई घरी आली तेव्हा तिला हा प्रकार कळला असता तिने तातडीने लगेच पोलिसात धाव घेतली. पित्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. (Beed Collector office: आंदोलन स्थळी महिला बाळंत, बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटना)
दरम्यान, यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच कळवा येथे एका 30 वर्षीय महिलेने आपल्याच सहा महिन्याच्या बाळाला पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये टाकून त्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. शांता चव्हाण असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा नवरा हा कामगार आहे. तसेच मृत बाळासह अन्य तिला दोन मुल सुद्धा असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.