मुंबई: कांदिवली येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; 9 जण जखमी

ही घटना कांदिवली पूर्वेकडील (kandivali West) संभाजी नगर (Sambhaji Nagar) येथे घडली.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas cylinder Explosion) झाल्याने 9 जण जखमी भाजल्याचे धकादायक माहिती समोर आली आहे. ही घटना कांदिवली पूर्वेकडील (kandivali West) संभाजी नगर (Sambhaji Nagar) येथे घडली. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली येथीलअग्नीशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी धांडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचून मदतकार्याला सुरुवात केली. महत्वाचे म्हणजे, हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची अद्याप माहिती मिळाली नाही. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कांदिवली पूर्वेकडील संभाजी नगर येथील एका घरात बुधवारी रात्री 11 वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. जानुपाडा परिसरातील गवारे चाळीतील कानडे यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यात कानडे कुटुंबियांच्या सदस्यांसोबत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकही जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी 20 ते 25 टक्के भाजल्याची समजते आहे. कानडे यांच्या घरात स्फोट होताच परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमनदलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. त्यानंतर जखमींना मोबाईल व्हॅनमधून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत, अशी माहिती एका वृत्त वेबसाईटने दिली आहे. हे देखील वाचा- अतिक्रमण हटवलं म्हणून पोलिसाचंच घर पेटवलं; कोल्हापूर मधील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, शारदा नामदेव कानडे (वय 56) संदीप नामदेव कानडे (वय 31) असे ज्यांच्या घरात स्फोट झाला त्यांची नावे आहेत. तसेच ओंकार दत्तात्रय चीके (वय 18), मेहुल सूरती (वय 30), जयेश सुतार (वय 30), दिवेश पटेल (वय 22), राजेश रणछोड दुबला (वय 40), निशांत तुषार, पांचाळ (वय 11) , दिव्यानि सुरती (वय 47) असे इतर जखमींची नावे आहेत. सध्या जखमींवर उपचार उपचार सुरु आहे. तसेच या घटनेमुळे कांदिवली परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.