दारुड्या पोलिसांकडून वडिलांची वाट पाहत उभ्या असलेल्या मुलीची छेडछाड, आरोपींना अटक
त्यामधील दोन कॉन्स्टेबल असून एक खबऱ्या देणारा आहे.
Mumbai: मुंबईत आपल्या वडिलांची वाट पाहत उभ्या असेलेल्या मुलीसमोर अश्लिल कृत्य करुन तिच्यावर वाईट कमेंट्स करणाऱ्या पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील दोन कॉन्स्टेबल असून एक खबऱ्या देणारा आहे.
जेव्हा पीडित मुलीने दारु प्यायलेल्या या लोकांकडे लक्ष दिले नाही त्यावेळी त्यांनी तिच्या समोर मूत्रविसर्जन केले. तसेच अत्यंत वाईट शब्दात तिच्यावर टीका करण्यात आली. भिवंडी येथील मानकोली नाका येथील ही घटना आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे शैलेश पटेल, जाधव आणि दिनेश पाटील अशी आहेत.(हेही वाचा-अंघोळ करणाऱ्या महिलेचा अश्लिल व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला अटक)
फ्रि प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबई येथून परिक्षा देऊन आलेली पीडीत मुलगी आपल्या वडिलांची मानकोली नाका येथे वाट पाहत उभी होती. त्यानंतर आरोपींनी तिच्याशी गैरप्रकार करण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने त्यांच्या या वागण्याचा निषेध केला असता तिचे कथितपणे उत्पीडन केले. त्याचसोबत बळजबरी करण्यास तिच्यावर सुरुवात केली.
या प्रकरणी वडिलांनी आरोपींना चोप देण्यास पुढे गेल्यास उलट मुलीच्या वडिलांवर त्यांनी हल्ला केला.पीडित मुलीच्या वडिलांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.