Mumbai: गोरेगाव येथे दारु पिऊन गाडी चालवत असताना अपघातात एकाचा मृत्यू, मित्राला पोलिसांकडून अट

मित्राचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती गोरेवाग पश्चिमेकडील पुलावरुन घसरली असता ही घटना घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गोरेगाव येथे एका 25 वर्षीय मुलाचा मित्राच्या बाईकवरुन जात असताना अपघात होत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असता त्याचा मृत्यू झाला आहे. मित्राचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती गोरेवाग पश्चिमेकडील पुलावरुन घसरली असता ही घटना घडली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गाडी चालवणारा हा विचित्र पद्धतीने ती चालवत होताच पण तो दारु सुद्धा प्यायला होता. तर ड्रिंग अॅन्ड ड्राइव्ह करत असल्यानेच मित्राचा जीव गेला आहे.(पुणे येथे सहा परदेशी नागरिकांकडे Mephedrone आणि Cocaine आढळल्याने पोलिसांकडून अटक)

पोलिसांनी याबद्दल माहिती देत असे म्हटले आहे की, एमटीएनएल जंक्शन पुलाच्या येथे ही घटना 12.15 वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी हे दोघे मित्र युनिकॉर्न बाईकवरुन गोरेगाव पूर्वेकडून ते पश्चिमेकडे जात होते.मृत तरुणाची ओखळ पटली असून यश वानिया असे त्याचे नाव आहे. तर अंकुर ओजा हा त्याचा मित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. हे दोघे सुद्धा मालाड येथील रहिवाशी असून ऑफिसवरुन निघाले होते. मात्र दोघांनी दारु प्यायल्याने ही घटना घडली आहे. आरोपीकडून बाईक अत्यंत वेगाने चालवली जात असल्यामुळेच त्यांचा अपघात झाल्याची माहिती गोरेगाव पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस हरिश गोस्वामी यांनी म्हटले आहे.(Balasaheb Thorat: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान Royal Stone बंगल्यात एकाकडून आत्महत्येचा प्रयत्न)

तर गोरेगाव पोलीस स्थानकात ओजा याच्या विरोधात सु मोटू एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच विविध कायद्याच्या कलमाअंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केले असून बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.