मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2556 वर पोहचला, महापालिकेची माहिती
त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहे. तर कंन्टेंटमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी नागरिकांसाठी सेवासुविधा सुरु करण्यात आल्या आहेत.
मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहे. तर कंन्टेंटमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी नागरिकांसाठी सेवासुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान धारावीतील सुद्धा कोरोनाची परिस्थितीवर नियंत्रण मिळत असल्याचे दिसून येते आहे. येथे कोरोनाच्या दुप्पटीचा वेग सुद्धा मंदावला गेला आहे. तर आज धारावीत कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2556 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
धारावीत कोरोनाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचसोबत धारावीत गेल्या काही दिवसांपासून नव्याचे कोणाचा बळी सुद्धा गेलेला नाही. सध्या धारावीत कोरोनाचे एकूण 77 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (पुणे: 29 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेने दिला दोन नवजात मुलींना जन्म)
मुंबईत शासनाच्या अथक प्रयत्नामुळे तसेच लोकांनी नियमांचे पालन केल्यामुळे ही परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत आहे. मुंबईत शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,13,187 वर पोहोचली आहे. काल मुंबईमध्ये 1058 कोरोना बाधित रुग्ण बरे आहेत, यासह शहरामध्ये आतापर्यंत एकूण 86,385 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच राज्यात कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 60.37 टक्के आहे. तर कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 3.58 टक्के इतका आहे. सध्या 9 लाखापेक्षा जास्त जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.