ST Bus Accident: मुंबई- दापोली एसटी बस शेनाळे घाटात उलटली; 4 जण किरकोळ जखमी

या अपघातामध्ये 4 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी सुरू झाली आहे. आज सकाळी मुंबईच्या परळ डेपो (Parel Depot)  तील दापोलीला जाणार्‍या एका एसटी बसचा अपघात झाला आहे. आज (5 सप्टेंबर) पहाटे 5 च्या सुमारास ही एसटी बस म्हाप्रळ (Mhapral) येथे शेनाळे(Shenale) घाटात उलटली आहे. या अपघातामध्ये 4 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे शेनाळे घाटात झालेल्या अपघातग्रस्त बस मध्ये 30 जण प्रवास करत होते. 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर, एसटी बस ड्रायव्हरच्या हाताला देखील थोडी दुखापत झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान औषधपाणी केल्यानंतर सर्व चार जखमींना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मंडणगड एसटी डेपो मॅनेजर फडतरे यांनी दिली आहे. (नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्राला पुन्हा मुसळधारेचा इशारा; आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये ऑरेंज अलर्ट).

अद्याप परळ-दापोली बसला नेमका अपघात झाला कसा याची माहिती मिळू शकलेली नाही. पण त्याबाबत चौकशी केली जाणार आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी डेपो मधून 100% क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आजपासून कोकणात प्रवास करणार्‍यांना लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.