Mumbai Cyber Crime: महिलेचा फोन हॅक करत Private Photos वरून ब्लॅकमेलिंग करणार्‍या पुरूषाला पुण्यात अटक

सोशल मीडीयामध्ये प्रायव्हेट फोटो अपलोड करेन या भीतीखाली त्याने 30 लाख लुबाडण्यासोबतच तिच्याकडील एसयुव्ही देखील त्याने घेतली.

Cyber Crime | Representational Image | (Photo Credits: Pixabay)Crime

41 वर्षीय व्यक्तीने एका महिलेचा फोन हॅक करून तिचा प्रायव्हेट फोटो घेतला आहे. या फोटोवरून तिला ब्लॅकमेलिंग देखील सुरू होते. दरम्यान या प्रकरणातील आरोपी युवराज भोसले याला अटक करण्यात आली आहे. महिलेचे बॅंक अकाऊंट्स तपशील वापरत त्याने 30 लाख रूपये ट्रांसफर देखील केल्याचं समोर आले आहे. महिला मुंबई मध्ये अ‍ॅनिमेटर म्हणून काम करत होती. आरोपीला शनिवारी पुण्यात तळेगाव मधून अटक करण्यात आली आहे.

2015 साली ही पिडीत महिला विवाहबद्ध झाली होती नंतर तिचा घटस्फोट देखील झाला. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, पीडीतेच्या कुटुंबियांनी दबाव टाकल्याने तिने मेट्रोमेंइअल साईट्स वर प्रोफाईल बनवलं होतं. सप्टेंबर 2020 मध्ये तिला नोकरीची संधी देण्यासाठी एक फोन कॉल देखील आला. नंतर एका प्रोडक्शन कंपनीमध्ये लीडर असल्याचं सांगत एका व्यक्तीकडून तिला फोन आला. त्याला तिने रिझ्युमे देखील पाठवला. काही दिवसांनी महिलेला व्हॉट्सअ‍ॅप वर तिने पासवर्ड टाकून बनवलेल्या फोल्डर मधील एक प्रायव्हेट फोटो आला. Sextortion बद्दल महाराष्ट्र सायबर कडून नागरिकांना महत्वाची सुचना जाहीर .

सोशल मीडीयामध्ये प्रायव्हेट फोटो अपलोड करेन या भीतीखाली त्याने 30 लाख लुबाडण्यासोबतच तिच्याकडील एसयुव्ही देखील त्याने घेतली. सोशल मीडीयात फोटो पोस्ट होईल या भीतीने तिने पोलिसांची मदत घेणं देखील टाळलं. मात्र 2 डिसेंबरला तिने धीर करत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीचा शोध सुरू केला. मुंबई सायबर सेल कडून आरोपीला पुण्याच्या तळेगाव मधून अटक करण्यात आली आहे. या आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांकडूनही पैसे उकळल्याचं समोर आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif