Mumbai Crime: प्रतिबंधित तंबाखु तस्करीप्रकरणात सात जणांना अटक, पालघर येथून १२ कोटींचा माल जप्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई क्राइम ब्रॅंच युनिट ९ ने पालघर परिसरातून तब्बल १२ कोटी रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखू तस्करी केल्या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.
Mumbai Crime: मुंबई क्राइम ब्रॅंचने पालघरमधून प्रतिबंधित तंबाखु तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. क्राइम ब्रॅंच युनिट 9 ने तब्बल 12 कोटी रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखू तस्करी केल्या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. या आधी क्राईम ब्रॅंचने तीन जणांना 50 लाख रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखू तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. पालघरातील कासा येथून सात जणांना प्रतिबंधित तंबाखू सह अटक केली. तपासादरम्यान, आरोपींपैकी एक जण तबांखू मुंबईत वाहतूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली, त्यामुळे नियोजित कारवाई करण्यात आली. 11 जानेवारीला चौघांना तर काही दिवसांपूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. (हेही वाचा- मालवणी पोलिसांनी ड्रग्जच्या कारखान्याचा केला पर्दाफाश)
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुबंई क्राईम ब्रॅंचने 11 जानेवारी रोजी पालघर शहराच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 48, गुन्हे शाखेने सापळा रचला. पोलिसांनी या प्रकरणी 400 मोठ्या गोण्या आणि 4,000 प्रतिबंधित तबांखूच्या लहान गोण्या असलेले चार ट्रक जप्त केले. हिरालाल मंडल (52), नासिर यलगर (40), जमीर सय्यद (32), संजय खरात (34) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.