Mumbai Crime News: अंधेरीमध्ये वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षाच्या मुलीची केली सुटका
अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचे रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Mumbai Crime News: मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचे रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींनी वेश्या व्यवसायासाठी एका अल्पवयीन मुलींचे शोषण केले पोलिसांनी त्या पीडित मुलीची सुटका केली आहे. हॉटेल व्यवस्थापकाचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छापा टाकून संशयितांना अटक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. (हेही वाचा-ठाण्यामध्ये वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश, चार मुलींची सुटका, महिला अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील सिल्व्हर क्लाऊड हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचे रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 10 ला मिळाली. या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी एका गुप्त अधिकारी तैनात केले. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकल्यानंतर सर्व माहिती उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी हॉटेलमध्ये सापडल्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका केली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुर्गा सिंग (३४) नावाच्या महिला दलाल आणि हॉटेल व्यवस्थापक मोहम्मद नावेद (२४) यांचा समावेश आहे. सिंग हा अल्पवयीन मुलींची विक्री करायचा, अशी माहिती हाती लागली आहे.
दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सात हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपींविरुद्ध कलम ३६३ (ए), ३७० (ए) (१), ३७२ आणि ३४, तसेच महिला आणि अनैतिक वर्तनाशी संबंधित कलम ४ आणि ५ आणि कलम १६, १७ नुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2023 08:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

