Titwala Crime: पतीची हत्याकरून पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव, टिटवाळ्यात खळबळ

महत्त्वाचे म्हणजे पत्नीने पतीची गळा दाबुन हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.

Crime Image File

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे राज्यातील पोलीस प्रशासनावर अतिरीक्त दबाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशातच टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळ्याच्या बल्यानी परिसरात पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पत्नीने पतीची गळा दाबुन हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे.  (हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये पाणीपुरीवाल्याकडून दारुड्या तरुणाची हत्या; परिसरात खळबळ)

टिटवाळा येथील बल्यानी परिसरात पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रविण मोरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी प्रणिता मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. प्रणिता मोरेने आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव हा रचला होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला.

पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून ही हत्या केल्याची कबुली आरोपी पत्नीने दिली आहे. या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे.