Mumbai Crime: शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावाने दीड लाख लुटले; दोघांना अटक
ही घटना मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरात घडली आहे. याप्रकरणी अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
शिवसेना नेते नितीन नादगांवकर यांच्या नावाने दीड लाख रुपयांची लूट केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरात घडली आहे. याप्रकरणी अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीची एका बिल्डरने फसवणूक केल्यामुळे त्याने नितीन नांदगावकर यांच्याकडे मदत मागितली होती. त्यावेळी त्याने नितीन नांदगावकर यांच्या फेसबुक फॅन पेजवरही आपला नंबर दिला होता. याचाच गैरफायदा घेऊन आरोपींनी त्या व्यक्तीची फसवणूक केल्याचे समजत आहे. या घटनेनंतर अंधेरी परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
सूरज निकम (वय, 24) आणि रोहित कांबळे (वय, 19) असे आरोपींची नावे आहेत. संदीप नावाच्या व्यक्तीने एका बिल्डरकडून घर घेण्यासाठी 18 लाख दिले होते. मात्र, बिल्डरने घर न दिल्याने संदीपने नितीन नांदगावकर यांची मदत मागितली. याशिवाय, नितीन नांदगावकर यांच्या फेसबुक फॅन पेजवर आपला नंबरही दिला होता. त्यावेळी आरोपींनी संदीप यांचा नंबरवर फोन केला. तसेच आपण नितीन नांदगावकर यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे संदीपला सांगितले. दरम्यान, मदत करण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी संदीप यांच्याकडून दीड लाखांपेक्षा जास्त पैसे घेतले. त्यानंतर आपला मोबाईल नंबर बंद केला. त्यावेळी नितीन नांदगावकर यांच्या नावाने आपल्याकडून पैसे उकळल्याचे लक्षात आल्यावर संदीप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात करुन सुरजला सातारा तर, रोहितला मुंबईतून अटक केली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! फेसबुकवरून ओळख झालेल्या मुलीकडून तब्बल 1 कोटी 43 लाखांची फसवणूक; तरुणाची पोलिसात धाव
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नागरिकांनी कोणताही व्यवहार करताना त्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. तसेच अनोळखी लोकांना आपल्या बॅंक डिटेल्स किंवा ओटीपी शेअर न करण्याचा आवाहन केले जाते. महत्वाचे म्हणजे, असेही काहीजण आहेत, ज्यांची अशी फसवणूक झालेली असताना बदनामीच्या भितीने त्यांनी पोलिसांत तक्रारच दाखल केली नाहीत. यामुळे गुन्हेगारांना एकप्रकारे अनेकांची फसवणूक करण्याचे प्रोत्साहन मिळते.