Mumbai COVID 19 Death: मुंबई मध्ये कोविड 19 बाधित रूग्णाचा मृत्यू

सर्दी, खोकला यांसह अनेक साथीचे आजार पसरले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

कोविड 19 चं संकट मंदावलं असलं तरीही त्याचे रूग्ण समोर येत आहेत. वेळीच केलेल्या उपचारांनी त्यावर आताही मात करणंही शक्य आहे. दरम्यान आता मुंबईत कोविड 19 (Mumbai COVID 19)  निर्बंध पूर्णपणे हटवले असले तरीही बुधवारी एका कोविड 19 बाधित रूग्णाचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मागील काही महिन्यातील ही कोविड 19 मृत्यूची पहिलीच नोंद आहे. दरम्यान या मृत्यूची नोंद बुधवार (9 ऑगस्ट) दिवशी झाली असली तरीही त्याचा मृत्यू जुलै महिन्यातील आहे. केवळ त्याची नोंद बुधवारी पालिकेकडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

TOI च्या वृत्तानुसार, मृत व्यक्ती 75 वर्षीय पुरूष होता. त्याला liver carcinoma चा आजार होता. अशी माहिती Dr Daksha Shah, BMC's executive health officer यांनी दिली आहे. Dr Daksha यांच्यानुसार या व्यक्तीला कोविड 19 ची लागण झाली होती पण मृत्यूचं प्राथमिक कारण कोविड नाही.

जून-जुलै महिन्यात मुंबईत अन्य कोविड मृत्यूची नोंद नाही. मात्र 1 जुलैला हा एक मृत्यू झाला होता ज्याची माहिती आता अपडेट केली जात आहे. सध्या कोविड 19 चे रूग्ण समोर येण्याचं प्रमाणही कमी झाले आहे तसेच कोविड 19 चे टेस्टिंगही कमी झाले आहे. राज्यात बुधवारी कोविड 19 चे 14 नवे रूग्ण समोर आले आहेत. नक्की वाचा: Covid-19 Eris Variant: मुंबईमध्ये आढळला कोरोना विषाणूच्या 'एरिस' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण; जाणून घ्या लक्षणे व कशी घ्याल काळजी .

सध्या मुंबई मध्ये पावसाळी आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकला यांसह अनेक साथीचे आजार पसरले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.