Mumbai: महिलेवर जोडप्याचा 6 वर्षे बलात्कार; ब्लॅकमेल करून दीड कोटी उकळले, पोलिसांकडून अटक

या जोडप्याला अटक करण्यात आली आहे आणि आम्ही त्यांना न्यायालयात हजर केले आहे, त्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात येत आहे.’

Rape | Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या कोलकाता समकक्षांच्या मदतीने, सय्यद युसूफ जमाल आणि त्याची पत्नी नाझ सय्यद या जोडप्याला कोलकाता (Kolkata) येथील न्यू मार्केट भागातील एका हॉटेलमधून अटक केली आहे. या जोडप्यावर एका महिलेवर सहा वर्षे बलात्कार (Rape) करून घटनेचे व्हिडिओ शूट करून तिचा छळ केल्याचा आरोप आहे. या दाम्पत्याला शहर न्यायालयात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला नेण्यात आले आहे. युसूफ आपल्या पत्नीसमोर या महिलेवर बलात्कार करत असे आणि नाज या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असे.

पीडितेने मुंबईतील नागपारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली. महिलेने पोलिसात तक्रार केली की, जोडप्याने हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी तिला दिली होती. महिलेने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, या जोडप्याने तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्याकडून सुमारे 1.5 कोटी रुपये उकळले. ते काही जादू-टोणाही करायचे असा आरोप तिने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याला पिडीत महिलेच्या किशोरवयीन मुलीसोबतही असेच कृत्य करायचे होते, तेव्हा महिलेने आपले मौन तोडले. महिलेने फिर्याद दिल्यानंतर हे जोडपे मुंबईतून पळून जाऊन न्यू मार्केट परिसरातील दोन हॉटेलमध्ये वेगळे राहत होते. शनिवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. (हेही वाचा: Pune Rape Case: पुण्यात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाला अटक)

कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुंबई पोलिसांना आमच्याकडून मदत हवी होती आणि आम्ही त्यांना सहकार्य केले. या जोडप्याला अटक करण्यात आली आहे आणि आम्ही त्यांना न्यायालयात हजर केले आहे, त्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात येत आहे.’