चर्चगेट - विरार AC Mumbai Local 14 सप्टेंबर पासून आठवड्याचे सात ही दिवस धावणार; पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा
शनिवार (14 सप्टेंबर) पासून आता नियमित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेसाठी चालवली जाणार आहे.
चर्चगेट ते विरार (Churchgate to Virar)या मुंबईतील पश्चिम मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली एसी लोकल (AC Local) आता पाच दिवसांऐवजी आठवडाभर म्हणजे सातही दिवस चालवण्याचा निर्णय पश्चिम प्रशासनाने घेतला आहे. शनिवार (14 सप्टेंबर) पासून आता नियमित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेसाठी चालवली जाणार आहे. 25 डिसेंबर 2017 पासून ही एसी लोकल सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सोमवार ते शुक्रवार दरम्यान ही लोकल नियमित 6 फेर्या करत होती. मात्र आता त्यांच्या फेर्या वाढवण्यात आल्या आहेत.
सुरूवातीच्या टप्प्यात चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांदरम्यान 5 दिवस एसी लोकल चालवली जात होती. त्यानंतर आता 1 जानेवारी 2018 पासून ही सेवा चर्चगेट ते विरार पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता एसी लोकल शनिवार - रविवार देखील या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रवाशांच्या मागणीवरून एसी लोकल सातही दिवस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; सहा एसी लोकल सेवेत दाखल
पश्चिम रेल्वे ट्वीट
Looking at the great potential for the AC local and in view of public demand, W. Rly has decided to run the AC local train services now on weekends too w.e.f 14th September 2019. Hence, now it will be run on all seven days of the week. #WRUpdates pic.twitter.com/5hWBJZAtvE
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आता भविष्यात एसी लोकलच्या फेर्यांमध्ये वाढ होणार आहे. अशी माहितीदेखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट 2019 दरम्यान सुमारे 23 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर यामधून सुमारे 9.61 कोटी रूपयांची कमाई केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)