मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल 15-20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी संतप्त
तर आज (13 जून) पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ऐन ऑफिसला जायच्या वेळेसच मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक गेल्या तीन-चार दिवसांपासून विस्कळीत होत आहे. तर आज (13 जून) पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर कल्याण येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला असून 15-20 मिनिटे उशिराने धावत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप दिसून येत असून स्थानकावर गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
कल्याण येथून मुंबईला येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र लोकल उशिराने धावण्यापाठचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. तर पावसामुळे सुद्धा काही वेळेस लोकल उशिराने धावत असल्याचे सांगितले जात आहे.
(मुंबई वांद्रे पश्चिम परिरसात एसव्ही रोड येथील स्कायवॉकच्या पत्र्याचे शेड कोसळले, दोन महिला जखमी)
तर वारंवार मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असल्याचे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. तसेच लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गर्दी गाड्यांमध्ये दिसून येत आहे.