मुंबई : 'मध्य रेल्वे'वर तांत्रिक बिघाड, CSMT कडे जाणाऱ्या लोकल आणि 'एक्सप्रेस ट्रेन'चं वेळापत्रक कोलमडलं

त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मस्जिद बंदर (Masjid Bandar)  ते करी रोड (Curry Road)  स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने आज मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक खोळंबली आहे. लोकल सोबातच एक्सप्रेस गाड्यांचेही (Express Trains)  वेळापत्रक खोळंबल्याने अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक सध्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येत आहे. त्यामुळे धीम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. सध्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेन्स किमान 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

रेल्वेकडून तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रवाशांना धीम्या मार्गावरून प्रवास करण्यासाठी विविध स्थानकांमध्ये उदघोषणा करण्यात येत आहे.