मुंबई: Google Pay वरुन 2 रुपये भरणे पडले महागात, युजर्सला 40 हजार रुपयांना गंडवले
त्यापैकीच एक गुगल पे असून त्याच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
सध्या डिजिटल पेमेंटला चालना मिळावी यासाठी विविध अॅप लॉन्च करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक गुगल पे असून त्याच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात अजून एक भर पडली असून एका ग्राहकाने गुगल पे वरुन 2 रुपये भरले असता त्यांना 40 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार मुंबई घडला आहे.
अॅन्टॉप हिल येथे राहणारे व्यावसायिक अमिताभ राजवंश यांना त्यांच्या क्रेडिट कार्डची वॅलिटिडी संपत आल्याचा एक खोटा फोन आला होता. त्यानुसार त्यांना वॅलिटिडी वाढवण्यासाठी 2 रुपये भरण्यास सांगितले. तसेच एक लिंक सुद्धा पाठवत त्यावर क्लिक केल्यानंतर 2 रुपये भरले. मात्र पुढच्या काही मिनिटात राजवंश यांच्या बँक खात्यामधून 40 हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यावेळी राजवंश यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी राजवंश यांनी ज्या क्रमांवरुन फोन आला त्यावर पुन्हा कॉलबॅक केला असता तो लागला नाही. त्यानंतर राजवंश यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी राजवंश यांची तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(डिजिटल व्यवहारांमध्ये Google Pay ला ग्राहकांची पसंती; स्पर्धेत BHIM App सर्वात मागे)
यापूर्वी सुद्धा एका नागरिकाने गुगल पे माध्यमातून इलेक्ट्रिक बिल भरले असता त्याची फसवणूक झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या व्यक्तीच्या बँक खात्यामधून 96 रुपयांची रोकड गायब झाली आहे.