मुंबई उच्च न्यायालय 27 जूनला देणार मराठा आरक्षण विरोधातील याचिकांचा अंतिम निर्णय
आता गुरूवारी (27 जून ) दिवशी सार्या याचिकांवर अंतिम सुनावणी होणार आहे
Pleas against Maratha Reservation: महाराष्ट्र राज्यात सरकारने मराठा समाजाला (Marath Reservation) 16% आरक्षण जाहीर केले. मात्र काही दिवसातच या आरक्षणाविरोधात न्यायालयात आव्हान देणार्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अखेर या सर्व याचिकांवरील अंतिम निकाल गुरूवार (27 जून) दिवशी देण्यात येईल असे आज जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) याबाबत सुनावणी होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश 2019: मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ANI Tweet
सरकारने लागू केलेल्या आरक्षणानुसार, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीच्या ठिकाणी 16% आरक्षण करण्यात आलं आहे. सध्या 12,10 वीचे निकाल लागले आहेत. यामध्ये आरक्षणामुळे प्रवेशप्रक्रिया किचकट झाली आहे. आज पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशप्रकियेमध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याला नकार दिला आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे. घटनेनुसार 50% हून अधिक आरक्षण देता येत नसल्याने आरक्षण रद्द करण्यात यावे, असे आव्हान याचिकेत म्हटले होते.