Mumbai: अंधेरी (पूर्व) ते गोरेगाव (पश्चिम) दरम्यान बीएमसी बांधणार चार पदरी उड्डाणपूल, जाणून घ्या सविस्तर
बीएमसीने प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत आणि सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतर, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून परवानग्या मागवल्या जातील.
मुंबईमध्ये (Mumbai) गोरेगाव खाडी ओलांडून अंधेरी (पूर्व) ते गोरेगाव (पश्चिम) जोडण्यासाठी बीएमसीने (BMC) चार पदरी उड्डाणपूल (Four-Lane Flyover) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या बांधकामासाठी नागरी संस्थेने 418, 53,30,000 रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. पूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा पूल 500 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असेल, जो स्टेनलेस स्टीलचा असेल. या पुलावर केबल आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
बीएमसीच्या मते, गोरेगाव खाडीजवळ 36.6 मीटर लांबीचा रस्ता आहे. 1991 च्या विकास आराखड्यात खाडी क्षेत्र हा पूल बांधण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. या परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आता पालिकेने बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाडी परिसरातील काही भूखंड खाजगी आहेत आणि 350 झोपडपट्ट्या देखील आहेत. अंधेरी (पूर्व) आणि गोरेगाव (पश्चिम) वॉर्ड कार्यालये या झोपडपट्ट्या कायदेशीर आहेत की नाही याची पडताळणी करतील आणि त्यानंतर त्या इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला जाईल.
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले. दुसऱ्यांदा या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत. साधारण स्टीलचा वापर करून पूल बांधण्याचे आम्ही पहिल्यांदाच ठरवले होते. नंतर, तो गंजू नये म्हणून स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा निर्णय घेतला, कारण हा पूल खाडीवर बांधला जाणार आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर केल्याने पुलाच्या देखभालीचा खर्च कमी होईल. (हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत टोल माफ)
बीएमसीने प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत आणि सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतर, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून परवानग्या मागवल्या जातील. या मार्गावर काही विजेच्या ताराही आहेत आणि त्या काढण्याबाबत बीएमसी कंपनीशी चर्चा करेल.