मुंबई: Victoria Carriages आता अंदाजात; आदित्य ठाकरे ने शेअर केली खास झलक (Watch Video)
आता व्हिक्टोरियाला घोडे न जोडता केवळ बॅटरीच्या मदतीने नव्या अंदाजात Victoria carriages दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर फिरणार आहेत.
दक्षिण मुंबईची सफर घडवणारी व्हिक्टोरीया आता नव्या रूपामध्ये पुन्हा मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे. आज शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) या नव्या Victoria Carriages ची एक झलक ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. आता व्हिक्टोरियाला घोडे न जोडता केवळ बॅटरीच्या मदतीने नव्या अंदाजात Victoria carriages दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर फिरणार आहेत.
मुंबईतील हेरिटेज झोन जपण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील Trident परिसरात फिरणार्या एका ट्रायल रनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. येत्या महिन्यात Victoria carriages सुरू होण्याची शक्यता आहे.
ANI Tweet
Ubo Ridez या कंपनीकडून आता बॅटरीवर चालणारी व्हिक्टोरिया धावणार आहे. यामध्ये जीपीएसदेखील चालणार आहे. त्याचा वेग प्रतिताशी 20 किमी धावणार आहेत. जून 2015 साली मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांवर होणार्या अत्याचारातून मुक्तता करण्यासाठी घोडागाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता Victoria carriages बॅटरीवर धावणार असल्याने त्यांचं मुंबईकरांना आकर्षण असेल.