भांडुप जलशुद्धीकरण संकुलनातील तांत्रिक दुरुस्तीनंतर आता महापालिकेकडून नागरिकांना पाणी गरम करुन पिण्याचे आवाहन
मात्र नंतर तांत्रिक बिघाड दुरुस्ती करत पाण्याचा पुरवठा पुर्ववत करण्यात आला होता.
Mumbai Water Supply: मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने भांडुप येथील जलशुद्धीकरण संकुलनात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र नंतर तांत्रिक बिघाड दुरुस्ती करत पाण्याचा पुरवठा पुर्ववत करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेने मुंबईकरांना पाणी पिण्यापूर्वी ते गरम करावे असे आवाहन केले आहे. तर पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील बहुतांश सोसायट्यांना टँकर्स मागवावे लागले होते. या व्यतिरिक्त टँकर मधील पाणी देण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल केले जात असल्याच्या सुद्धा काहींनी तक्रारी केल्या आहेत.
पावसामुळे जलशुद्धीकरण संकुलनाला फटका बसत पाण्याचा पुरवठा अचानक बंद झाला.यामुळे रविवारी मुंबईतील बहुतांश ठिकाणी पाण्याची कमतरता नागरिकांना जाणवली. पण नंतर जलशुद्धीकरण संकुलनात दुरुस्ती केल्यानंतर पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला गेला. त्यामुळे आता पाण्याचा पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर नागरिकांनी पाणी गरम करुन प्यावे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.(Mumbai Rains: मुंबईमधील पावसामुळे राष्ट्रीय उद्यानामधील हरीण आले मानवी वस्तीत; पोहत काढू लागले मार्ग Watch Video)
Tweet:
भांडुप जलशुद्धीकरण संकुलनात पावसाचे पाणी शिरल्याने तांत्रिक बिघाड झाला. याच कारणामुळे पाणीपुरवठा खंडित होत त्याचा नागरिकांना फटका बसला. मुंबईसह उपनगरात पाण्याचा पुरवठा करणे ही अशक्य झाले. महापालिकेने असे म्हटले की, जलशुद्धीकरण संकुलनात झालेला तांत्रिक बिघाडामुळे पाण्याचा पुरवठा करण्यास थोडा वेळ लागू शकतो.