मुंबई महापालिकेकडून 50 लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जाणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

त्यामुळे कोरोनच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागावर पडत असलेला ताण पाहता रुग्णांवर ही उपचार करणे थोडे मुश्किल होत आहे.

Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे कोरोनच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागावर पडत असलेला ताण पाहता रुग्णांवर ही उपचार करणे थोडे मुश्किल होत आहे. अशातच राज्यात येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिाकांना लसीचे डोस दिले जात आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून बहुतांश लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले आहे की, मुंबईत कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र लसीकरणासाठी लसीच्या डोसचा तुटवडा पडत असल्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळेच 50 लाख लसींसाठी एक ग्लोबली टेंडर काढून त्या खरेदी केल्या जाणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवस महापालिका आयुक्तांकडून यासाठी टेंडर काढले जाणार असून सर्वांना मोफत लस दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(BMC ने शेअर केली 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या केंद्रांची संपूर्ण यादी)

पुढे किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, पालिका आयुक्त लसींच्या डोससाठी ग्लोबल टेंडर काढणार आहेत. तर सर्वांना मोफत लस देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ही त्यांनी म्हटले. तर ज्यांच्याकडून मोफत लस नागरिकांना द्यावी असे वारंवार सांगितले जात आहे. त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन पहावे ती मोफतच दिली जात असल्याचे पेडणकर यांनी म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुंबईत आज कोरोनाचे आखणी 1794 रुग्ण आढळले असून 3580 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेकडून दिली गेली आहे. तर शहरात एकूण 616998 जणांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. तर बरे रुग्ण होण्याचा दर 91 टक्के असून सक्रिय रुग्ण 45534 आहे.