उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल होणार
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गासाठी रविवारी (10 मार्च) रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गासाठी रविवारी (10 मार्च) रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते दिवा, पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र पनवेल आणि कुर्ला रेल्वेस्थानकावरुन विशेष लोकलची सोय करण्यात आली आहे.
रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणा, रुळ दुरुस्तीसह अन्य कामासाठी हा जम्बोब्लॉक उद्या घेण्यात आला आहे. सकाळी 10.54 ते दुपारी 3.43 पर्यंत कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गाने धावणार आहेत. तर ठाणे ते सीएसएमटी स्थानकावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.(हेही वाचा-मुंबई - पुणे महामार्गावर 12 ते 20 मार्च दरम्यान मेगा ब्लॉक; पहा मेगा ब्लॉक कोणत्या वेळेत कसा असेल?)
तसेच जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा येथे थांबणार आहेत. मात्र इच्छित स्थळावर लोकल 15 मिनिटे उशिरा येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत मेल, एक्सप्रेस या मेगाब्लॉकमुळे 30 मिनिटे उशिरा पोहचणार आहेत. यामुळे प्रवाशांना रविवारी मेगाब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागणार आहे.