मुंबई: गतिमंद-सावत्र मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
मुंबईत एका गतिमंद आणि सावत्र मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुंबईत एका गतिमंद आणि सावत्र मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या पीडित मुलीचे ही महिला अमानुष छळ करत असे. तसेच मुलीचे डोळे निकामी करण्यापर्यंत या महिलेने तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी पुराव्यासह सत्र न्यायालयात हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, 2015 मध्ये या मुलीचा मृत्यू झाला होता. तर मृत्यूनंतर शवविच्छेदनाच्या रिपोर्ट्सनुसार मुलीच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या होत्या. तसेच डोळे सुद्धा निकामी करण्याचा धक्कादायक पराक्रम महिलेने केला होता. याबाबात आता दाखल करण्यात आलेल्या अहवालातून मुलीवर अत्याचार केल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका विवाहित जोडप्यातील महिलेने ही मुलगी सावत्र आणि गतिमंत असल्याने तिला अनाथाश्रमात पाठवून देऊ असे नवऱ्याला वारंवार सांगत होती. परंतु नवरा बायकोच्या या गोष्टीवर अजिबात मान्य नसल्याने तिने मुलीचे अशा प्रकारे अमानुष छळ करण्यास सुरुवात केली.(ठाणे: वज्रेश्वरी मंदिरात दरोडा घालणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ठोठावल्या बेड्या)
तर पोलिसांनी केलेल्या तपास आणि चौकशीअंती महिलेने आपला गुन्हा कबुल केला. त्यामुळेच पुराव्यानिशी सत्र न्यायालयाने तिला ही कडक शिक्षा सुनावली आहे.