Mumbai: दादर येथे बेस्ट बस अपघातात चालकाचा मृत्यू तर कंटक्टरची प्रकृती गंभीर

मात्र आता त्यांचा सायन रुग्णालयात आज मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याचसोबत बसचे कंडक्टर कृष्णनाथ धुरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

दादर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात चालक राजेंद्र काळे हे जखमी झाले होते. मात्र आता त्यांचा सायन रुग्णालयात आज मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याचसोबत बसचे कंडक्टर कृष्णनाथ धुरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघात हा बुधवारी घडला असून जेव्हा वेगाने आलेली बस डंपरला जाऊन धडकली होती.(Mumbai Crime: बोरिवलीमध्ये हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला लुटण्याचा प्रयत्नात केली हत्या, शोध घेत पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात)

अपघातात दोन जणांसह त्यात बेस्ट बस चालक आणि कंडक्टर यांच्यासह दोन लहान मुल जखमी झाली. बस डंपरला धडकल्याने त्याच्या पुढील बाजूचा चुराडा झाला. अपघातानंतर बसमध्ये आपल्या सीटवर अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. परंतु त्याला मेटल फ्रेम आणि खिडकीच्या काचांमुळे त्याला खुप जखम झाली होती. तातडीने चालकाला सायन रुग्णालयात हलवण्यात आले.(Double Murder In Byculla: अवघ्या 15 मिनिटांत दोघांची हत्या, भायखळा येथून संशयीत सायको किलर पोलिसांच्या ताब्यात)

दरम्यान, दादर टीटी येथे झालेल्या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य चार जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे. त्याचसोबत दोन जणांना हलक्या स्वरुपात जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल केले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.