Mumbai: बँक मेनेजरची KYC च्या नावाखाली 60 हजार रुपयांची फसवणूक
सदर व्यक्ती ही एका राष्ट्रीय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असून त्याला 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
Mumbai: मुंबईतील एका 48 वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन केवायसीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर व्यक्ती ही एका राष्ट्रीय बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत असून त्याला 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पवई येथे राहणारी ही महिला असून तिला मोबाइलवर एक एसएमएस आला. त्यामध्ये पॅन कार्ड हे बँक खात्यासाठी अपडेट करण्यासंदर्भात सांगण्यात आले होते.(Crime: फाटलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे भिवंडीत एका व्यक्तीच्या खुनाच्या तपासाला पोलिसांना यश, तिघांना अटक)
प्रथम तिने पॅन कार्ड हे स्वत: हून अपडेट करण्याचा प्रयत्न केला पण ते झाले नाही. त्यानंतर तिने एसएमएस मधील क्रमांकावर फोन केला. फोनवरील व्यक्ती तिला लगेच मदत करण्यास तयार झाला. असे झाल्यानंतर त्याने तिला बँक खात्याची अधिक माहिती विचारली आणि तिने कोणताही विचार न करता त्याच्यासोबत शेअर केली. तसेच ओटीपी ही त्याला सांगितला.(Cyber Crime: सायबर गुन्ह्यात महाराष्ट्रातील अनेक तरुणांकडून एका वर्षात 87 कोटी रुपये लुटले, पुण्यात फसवणूकीचे प्रमाण सर्वात जास्त)
महिलेच्या खात्यातून लगेच पैसे काढले गेले. त्यामुळे तिने त्या व्यक्तीला पैसे काढले गेल्यासंदर्भात विचारण्यासाठी फोन लावला. पण त्याने तिला चुकून खात्यातून पैसे गेल्याचे म्हटले. त्यानंतर त्याने तिला आणखी एक ओटीपी शेअर करण्यास सांगितला जेणेकरुन काढलेले पैसे खात्यात परत येतील असे पोलिसांनी म्हटले. त्यावेळी महिलेल आपण ओटीपी शेअर केल्याने हा प्रकार घडल्याचा संशय आला. तेव्हाच तिने बँकेत आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली.