Mumbai: वांद्रे, अंधेरी येथे येत्या 2-3 फेब्रुवारीला पाण्याचा कमी दाबाने पुरवठा केला जाणार
त्यानुसार के वेस्ट, के ईस्ट, एच वेस्ट आणि एच ईस्ट वॉर्डात याचा परिणाम होणार आहे.
Mumbai Water Supply Update: मुंबईतील वांद्रे आणि अंधेरीत येत्या 2 आणि 3 फेब्रुवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे जाही करण्यात आले आहे. त्यानुसार के वेस्ट, के ईस्ट, एच वेस्ट आणि एच ईस्ट वॉर्डात याचा परिणाम होणार आहे. तर चकाला येथे पाण्याच्या पाईपच्या मुख्य जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.(Mumbai Local सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जय्यत तयारी; सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम सज्ज)
पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात येणार असल्याने वांद्रे पूर्व आणि पश्चिम भागासह अंधरेतील परिसरात याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी दाबाने केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तर येत्या 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 6.30 ते 3 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत कमी दाबाने पाणी सोडले जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Lockdown in Maharashtra: राज्यात 28 फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन कायम)
यामुळे संबंधित नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी बदलविण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.