IPL Auction 2025 Live

Mumbai: पालकांनी मोबाईल हिसकावल्याने 12 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

सातत्याने मोबाईल पाहात असल्याने पालकांनी त्याचा मोबाईल (Mobile) हिसकावला आणि त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याचाच राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले.

मुंबई (Mumbai) येथील कांदिवली (Kandivali) परिसरात राहणाऱ्या 12 वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सातत्याने मोबाईल पाहात असल्याने पालकांनी त्याचा मोबाईल (Mobile) हिसकावला आणि त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याचाच राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले. दरम्यान, पालिकांनी त्याला छताला लटकताना पाहिले. त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली, त्यावेळी मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. त्याच्या पालकांनी त्याला ते बंद करण्यास सांगितले आणि त्याला घराबाहेर खेळण्यास सांगितले. मुलाने आपला फोन बंद केल्यासारखे दाखवले. पण बाहेर पडताच त्याने पुन्हा गेम खेळायला सुरुवात केली. त्याच्या पालकांनी फोन काढून घेतल्यावर त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पालकांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला त्याला वाचवले. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, पुणे: मोबाईलवरून पालक ओडरले म्हणून 20 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या)

पालकांनी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, त्याची स्थिती पाहून जवळपास चार रुग्णालयांनी त्याला दाखल करुन घ्यायला नकार दिल्याचा दावा पालकांनी केला आहे. सध्या त्याला अथर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मीड डे ने याबाबत वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, हा मुलगा इयत्ता सातवीचा विद्यार्थी असून, त्याला फोनवर गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याच्या या सवयीला कंटाळून त्याच्या आई-वडीलांनी अखेर शुक्रवारी रात्री त्याचा फोन हिसकावून घेतला. त्यांनी सांगितले की, सातत्याने गेम खेळून या मुलालाला मानेचा त्रास सुरु झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाच्या मानेवर अनेक जखमा बाह्य आणि अतर्गत अवस्थेत झाल्या आहेत. या जखमा नेमक्या कशाच्या आहेत याबाबत अधिकारी आता पालकांचे जबाब नोंदवत आहेत. मुलगा उपचार घेऊन बरा झाल्यावर ते त्याचे बयाण घेणार आहेत.