दादर, वसई स्थानकातील पादचारी पूल 14 पासून रहदारीसाठी बंद

पूलाची दुरूस्ती आणि पुर्नबांधणी यासाठी 100 कोटू 87 लाख रूपये पुरवले जाणार आहेत.

Dadar Station (Photo Credits : commons.wikimedia)

मुंबईमध्ये पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची पाहणी करून धोकादायक पूल रहदारीसाठी बंद करून त्याच्या डागडुजीचं काम हातामध्ये घेत आहेत. यामध्ये आता दादर (Dadar) आणि वसई (Vasai) रेल्वे स्थानकांमधील पादचारी पूलांचाही समावेश आहे. या स्थानकांमधील ब्रीज 14 मे पासून सुरक्षेच्या कारणावरून बंद केले जाणार आहेत.

दादर स्थानकामध्ये चर्चगेट दिशेकडील पादचारी पूल येत्या 14 मे पासून बंद केला जाईल. त्यामुळे दादर स्थानकावर प्रवाशांना आता केवळ 4 पूल रहदारीसाठी खुले राहणार आहेत.वसई स्थानकामध्येही प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वरील पादचारी पूलाचं काम हाती घेण्यात आलं आहे. 14 मे ते 29 मे दरम्यान हे काम हाती घेतले जाणार आहे.

काही महिन्यांपूर्वी सीएसएमटी स्थानकामध्ये झालेल्या पूल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेमार्गावरील 42 नवे पूल बांधले जाणार आहेत. पूलाची दुरूस्ती आणि पुर्नबांधणी यासाठी 100 कोटू 87 लाख रूपये पुरवले जाणार आहेत.