मुंबई: तांत्रिक बिघाड दुरुस्तीनंतर हार्बर रेल्वेची विस्कळीत वाहतूक धिम्या गतीने सुरु झाल्याचे वृत्त

त्यामुळे हार्बरच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.

Technical Fault On Harbour Line Resulting Into Delay In Trains | (Photo credit: archived, edited, representative image)

Train traffic resumes on Harbor route: मुंबई शहरातील सायंकाळ म्हणजे सर्व रेल्वे स्थानकं गर्दीने तुडूंब भरण्याची आणि ओसंडून वाहण्याची वेळ. नेमकी याच वेळी मुंबई हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbor Rail route) वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल असा हा प्रदीर्घ अंतर असलेला रेल्वेमार्ग. या रेल्वेमार्गावरील रे रोड स्थानकादरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची माहती असून, हा तांत्रिक बिघाडच वाहतूक विस्कळीत होण्याला कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हा बिघाड दूर होऊन वाहतूक सुरु झाल्याचे समजते.

सोमवार हा साप्ताहिक सुट्टी नंतरचा आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नोकरदार वर्गासोबतच इतरही अनेक मुंबईकर कामासाठी घराबाहेर पडतात. दिवसभरातील काम पूर्ण झाल्यानंतर हे मुंबईकर आपल्या घराच्या दिशने निघतात. त्यासाठी मुंबई रेल्वे हा एकमेव वेगवान आणि खिशाला परवडणारा प्रवास ठरतो. त्यामुळे जवळपास सर्वच मुंबईकर रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय निवडतात. अशा वेळी जर रेल्वेवारतूक विस्कळीत झाली तर, प्रवाशांना त्रास होतोच. पण, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरही ताण येऊन ती कोलमडण्याची शक्यता निर्माण होते. (हेही वाचा, वंदे भारत ट्रेन: 1,850 रुपयांत करा वाराणसी ते दिल्ली गारेगार प्रवास, एक्झिक्युटीव्ह क्लासला मोजावे लागणार 3,520 रुपये)

दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, रे रोडवरील ट्रान्सफॉर्मरमध्ये छोटे-छोटे स्फोट झाले. त्यामुळे हार्बरच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.