Mumbai Accident: ट्रक ची दोरी तुटली अन लोखंडी वस्तू पडली डोक्यात; वांद्रे परिसरातील घटनेत Hotelier Vijay Asrani चा मृत्यू

त्यामुळे ट्रकमधील सामान डोक्यात पडून एकाचा मृत्यू झाला आहे

Death PC PIXABAY

मुंबई मध्ये आयुष्य धकाधकीचे आहे. सततच लोकं जीव मुठीत घेऊन जगत असतात. वांद्रे परिसरामध्ये टर्नर रोड (Bandra Turner Road) वर रविवारी (23 जून) अशाच एका दुर्घटनेमध्ये पादचार्‍याचा मृत्यू झाला आहे. कोस्टल रोडच्या (Costal Road) कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन जाणार्‍या ट्रक वरील दोरी तुटून लोखंडी साहित्य डोक्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव विजय असराणी (Hotelier Vijay Asrani) असून त्याचा या दुर्घटनेमध्ये करूण अंत झाला आहे.

कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी गज आणि अन्य वस्तू घेऊन जाणार्‍या ट्रकवर बांधलेली दोरी झाडाच्या फांदीला घासून तुटली. त्यामुळे ट्रकमधील सामान पडले. यावेळी रस्ताच्या बाजूला फुटपाथवरून चालणार्‍या विजय यांच्या डोक्यात काही वस्तू पडल्या. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान तातडीने त्यांना भाभा रूग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. या दुर्घटनेमध्ये पोलिसांनी ट्रक चालक आलम अंसारी याला अटक केली आहे. BEST Bus Driver Slapped by Commuters In Bandra: वांद्रे पूर्व भागामध्ये बेस्ट बस स्टॉप वर थांबवता पुढे नेल्याने चालकाला 3 प्रवाशांकडून मारहाण; एक जण अटकेत .

पोलिसांच्या माहितीनुसार कोस्टल रोड च्या वांद्रे येथील भागात वस्तू पोहचवताना तो ट्रक चालक वेगात गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टात सादर केले. सध्या त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. काम संपवून विजय यांना चालण्याची सवय असल्याचं त्याच्या मित्राने पोलिसांना सांगितले. दरम्यान स्थानिक अपघात पाहताच पेट्रोलिंग पोलिसांना माहिती दिली आणि त्यांनी आधी विजयला हॉस्पिटल मध्ये नेले नंतर चालकाला अटक केली.

चालक मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता का? याचा तपास पोलिस घेत आहेत. तर मृत विजय हे हॉटेल व्यावसायिक होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif