मुंबई: तबलिगींविरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी धारावी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूमुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूमुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. याचाच गैरफायदा घेत अनेकजण नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केले जात आहेत. यातच मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi)परिसरात राहणाऱ्या एका व्यक्ती तबलिगींविरोधात अफवा पसरवल्याबद्दल त्याच्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आपल्यावर तबलिगी जमातच्या सदस्यांकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा केला आहे. डॉ बालिगा नगर परिसरात आपल्यावर हा हल्ला करण्यात आला असे आरोपीचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर तबलिगी जमातचे सदस्य आपल्यावर थुंकले असाही, दावा त्याने केला आहे. यामुळे धारावी परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चुकीचा माहितीचा प्रसार केला जात आहे. कोरोना विषाणूबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथी निझामुद्दीन परिसरात तबलिगी जमातींचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात आलेल्या काही लोक कोरोनाबाधीत होते आणि त्यांच्या गैरजबाबदारीपणामुळेच कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे तबलिगीं जमातींच्या बाबतीत समाजात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहेत. याचाच गैरफायदा घेत धारावी परिसरात राहणाऱ्या एखा व्यक्तीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तबलिगी जमातींच्या सदस्यांनी आपल्यावर हल्ला केला आहे. एवढेच नव्हेतर ते आपल्यावर थुंकले आहेत, असा दावा संबंधित व्यक्तीने केला होता. मात्र ,पोलीस तपासात हा व्यक्ती अफवा पसरवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शाहूनगर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डॉ. बालिगा नगर परिसरात वाद झाल्याची कबुली दिली आहे. पण ही व्यक्ती तबलिगी जमातच्या नावाचा वापर करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे देखील वाचा- Coronavirus: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.