Mumbai: ड्रग्स विक्री करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला NCB कडून अटक; इन्स्टाग्रामद्वारे जोडत होती नवे ग्राहक
तिच्याकडून दीड लाखांची रोकड आणि एमडी ड्र्ग्ज जप्त करण्यात आले आहेत.
इन्स्टाग्रामद्वारे (Instagram) ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीला एनसीबीने (NCB) मुंबईच्या (Mumbai) डोंगरी (Dongri) परिसरातून अटक केली आहे. तिच्याकडून दीड लाखांची रोकड आणि एमडी ड्र्ग्ज जप्त करण्यात आले आहेत. इकरा कुरैशी असं तिचं नाव असून ती ड्रग्ज क्वीन म्हणून ओळखली जात होती. तिच्याकडे एमडी ड्रग्ज, एल एसडी आणि चरस उपलब्ध होतं. ग्राहकांच्या मागणीनुसार, ती याचा पुरवठा करत असे. ही तरुणी चिंकू पठाण गँगमधील लोकांसोबत काम करत होती.
या ड्रिग क्वीनची माहिती मिळाली होती मात्र तिला पकडणं सोपं नव्हतं. मागील 3 महिन्यांपासून एनसीबीचं पथक तिच्या मागावर होतं. परंतु, प्रत्येक वेळेस ती पळ काढण्यात यशस्वी ठरली. अखेर तिला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. (Drug Case in Mumbai: NCB कडून 19 वर्षीय मुलगा 2.3 लाख रोकड, ड्रग्ससह अटकेत; बॉलिवूड कलाकारांना पोहचवायचा ड्र्ग्स)
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरका कुरैशी ड्रग्स विकण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर करत असे. इंस्टाग्रामद्वारे तिने अनेक नवे ग्राहक जोडले होते आणि त्यांच्या मागण्या ती पूर्ण करत असे. तसंच तिने ड्रग्सची डिलिव्हरी करण्यासाठी 5-6 महिलांना नियुक्त केले होते. ऑर्डर मिळाल्यानंतर या महिला ड्रग डिलिव्हरी करत असतं.
विशेष म्हणजे तिचा मोबाईल टॅप होऊ शकतो असा अंदाज असल्याने डिलिव्हरीसाठी ती दुसरा फोन वापरत असे. त्यामुळे तिला पकडणे सोपे नव्हते. मात्र एनसीबीकडे तिच्याविरुग्ध सशक्त पुरावे होते, असा दावाही त्यांनी केला आहे. कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत असल्याचे जाणवताच ती त्याची माहिती आपल्या बॉयफ्रेंडला देत असे. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंड त्या व्यक्तीला धमकावत असे. यामुळे तिच्या बॉयफ्रेंड विरुद्ध मुंबई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.