मुंबई: आदर्श नगर येथे गटारीत पडलेल्या 19 वर्षी तरुणीचा मृत्यू, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
कोमल मंडल ही ओशिवारा येथील मेगा मॉल जवळ राहणारी आहे. मुंबई शहरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर उघडे असलेले मॅन होल अनेकदा मृत्यूचे सापळे बनले आहेत. या तरुणीचाही मृत्यू मॅनहोलमध्येच पडून झाला. या घटनेनंतर उघडे असलेले मॅन होल हा चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रस्त्याकडेला असलेल्या गटारीत पडून एका 19 वर्षी तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आदर्शनगर (Adarsh Nagar), आंधेरी पश्चिम (Andheri West), मुंबई (Mumbai) येथे घडली. या तरुणीचा मृतदेह गटारीतून शोधून काढण्यास पोलिसांना यश आले आहे. मृतदेह शविविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कोमल जयराम मंडल असे तरुणीचे नाव असून, मंगळवारी सायंकाळी ती गटारीत पडली होती. रात्री उशीरपर्यंत तिचा शोध सुरु होता.
प्राप्त माहितीनुसार, कोमल मंडल ही ओशिवारा येथील मेगा मॉल जवळ राहणारी आहे. मुंबई शहरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर उघडे असलेले मॅन होल अनेकदा मृत्यूचे सापळे बनले आहेत. या तरुणीचाही मृत्यू मॅनहोलमध्येच पडून झाला. या घटनेनंतर उघडे असलेले मॅन होल हा चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (हेही वाचा, ओशिवरा परिसरात 19 वर्षीय तरुणी नाल्यात पडली)
दम्यानान, या आधीही मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका लहान मुलाचाही नाल्यात पडून अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. त्यानंतर उघडे असलेली मॅन होल बंद करण्याचा काम मुंबई महापालिने मोठ्या प्रमाणावर हाती घेतले होते. मात्र, असे असतानाही या घटना वारंवार घडत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2020 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

