मुंबई: वसई-विरार महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; प्रशिक्षकासह चार जण अटकेत
कृष्णा टाऊनशीप वसई पश्चिम येथील वसई विरार म्युनिसिपल कॉर्परेशन स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स मध्ये क्लासच्या पहिल्याच दिवशी निष्काळीपणामुले तिसरीतील मुलाचा दुर्दैवी मृत्यू
परीक्षा संपल्याने आता अनेक शाळांना उन्हाळी सुट्टी आहे. दरम्यान सुट्ट्यांच्या काळात पोहण्याच्या क्लासला गेलेल्या वसई मधील एका विद्यार्थ्याचा पहिलाच दिवशी पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्विमिंग कोचसह चौघांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा टाऊनशीप वसई पश्चिम येथील वसई विरार म्युनिसिपल कॉर्परेशन स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स (Vasai Virar Municipal Corporation swimming pool complex ) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वसंत नगरी वसई येथील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा युग लधवा या चिमुकल्याची वर्षिक परीक्षा शुक्रवारी संपली. रविवार पासून युग वसई विरार महानगर पालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पोहणं शिकायला गेला होता. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास युगच्या पालकांनी इतर विद्यार्थ्यांसह त्याला सोडले. तासाभराने सारे विद्यार्थी बाहेर आले मात्र युग न दिसल्याने त्याच्या पालकांनी विचारणा केली. इतरत्र शोधाशोध केली. त्यावेळेस काही कर्मचारी युगला वाचवण्याचे प्रयत्न करताना दिसले. तात्काळ युगला नजीकच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र प्राथमिक अहवालानुसार युगचा मृत्यू बुडल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पालिकेच्या स्विमिंग टॅंगवर लाईफ गार्ड नसल्याच्या, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोप युगच्या कुटूंबाकडून करण्यात आला आहे.
इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 304 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप सिद्ध झाल्यास 2 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.