मुंबई: BEST विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांवर पोहचला

Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

बेस्ट विभागातील कोरोनाग्रस्तांचा शनिवारी आकडा 2 हजारांवर पोहचला आहे. तर रिकव्हरी रेट 60 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. बेस्ट मधीलच महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिला सावंत असे महिलेने नाव असून त्या मालवणी डेपोत ट्राफिक सुपरव्हायजर म्हणून कार्यरत आहेत. सावंत यांना कॅन्सरचा आजार सुद्धा असून त्यांनी आता कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतल्या आहेत.(Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 511 नवे कोरोना बाधित रुग्ण; 7 पोलिसांचा मृत्यू)

शिला सावंत याचे पती माझगाव डॉक येथे काम करतात. परंतु त्यांनी पत्नीसाठी रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता कुठे आहे का ते पाहिले नाही. यावर सावंत यांनी कोविड रिस्पॉन्स टीमला संपर्क केला असता त्यांना दहिसर चेक नाका कोविड सेंटरमध्ये 27 ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. 30 ऑगस्ट पासून त्या ऑक्सिजनवर होत्या आणि 2 सप्टेंबर रोजी पर्यंत त्यांना उत्तम उपचार मिळाल्याने डिस्चार्ज देण्यात आल्याचे बेस्ट चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. अनिल कुमार सिंघाल यांनी म्हटले आहे.

बेस्ट विभागातील जवळजवळ 50 जणांना रेमडेसिवीर इंजेक्शन कोविड रिस्पॉन्स टीमकडून देण्यात आल्याने त्यांची प्रकृती सुधारली आहे. तर आठवड्याभरात सेव्हन हिल्स रुग्णालयातील 25 रुग्णांना सुद्धा हे इंजेक्शन दिले गेले आहे. डॉ. सिंघाल यांनी असे म्हटले आहे की, आम्ही आपत्कालीन काळासाठी रेमडेसिवीरचा साठा करुन ठेवला आहे. जेणेकरुन कर्मचाऱ्यांचा जीव वाचवता येईल. गेल्या दोन महिन्यांपासून बेस्ट विभागातील कंन्टटर्स आणि ड्रायव्हर यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.(महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ठरवलेल्या रक्कमेपेक्षा बिलाचे अधिक पैसे उकळल्यास सदर व्यक्तीला 5 पट दंड किंवा शिक्षा केली जाणार- राजेश टोपे)

दरम्यान, बेस्ट मधील एकूण 27 जणांचा मृत्यू गेला आहे. तर युनियन लीडर शशांक राव यांनी असा दावा केला आहे की, 115 जणांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट कोविड रिस्पॉन्स टीम हे बेड्स, आयसीयू सुविधांसह रेमडिसीवर औषधांची उपलब्धता करुन देतात. जवळजवळ 1800 जणांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परते असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif