Mumbai: ड्रग्ज वापरुन केक तयार करणाऱ्या 25 वर्षीय डॉक्टरचा NCB कडून पर्दाफाश, आरोपीला अटक
त्यानुसार अशा एका केक बेकरीवर त्यांनी छापेमारी केली जेथे ड्रग्जचा (Drugs) वापर करुन केक तयार केले जात होते.
मुंबईतील एनसीबीच्या (NCB) पथकाकडून पुन्हा एकदा ड्रग्जचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार अशा एका केक बेकरीवर त्यांनी छापेमारी केली जेथे ड्रग्जचा (Drugs) वापर करुन केक तयार केले जात होते. या प्रकरणी एनसीबीकडून सायकोलॉजिस्ट डॉक्टरला अटक केली आहे. याव्यतिरिक्त आणखी एका सप्लायरला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव रहमिन चरमिया असे आहे. त्याचे वय 25 वर्ष असून तो आपल्या महाविद्यालयाच्या दिवसापासूनच या प्रकारची ड्रग्जची बेकरी करत होता.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी असे म्हटले की, आम्हाला माहिती मिळाली की ड्रग्जचा वापर करुन तीन प्रकारचे केक तयार केले जात आहेत. हे केक बड्या पार्ट्यांसाठी पुरवले जातात. याची माहिती मिळताच मुंबईतील माझगाव येथे ट्रॅपिंग करुन दुकानावर छापा मारला. तेथून आरोपीकडून 10 किलोग्रॅमचे हॅश ब्राउनी जप्त केले.
चरमिया याने असे म्हटले की, ड्रग्ज संबंधित काही गोष्टी तो पाहत होता. त्यानंतर याबद्दल अधिक जाणून घेतल्यानंतर केक तयार करुन विक्री करण्यास सुरुवात केली. चरमिया मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात सायकोलॉजिस्टचे काम सुद्धा करत होता. केक हे ऑर्डरनुसार त्या ड्रग्जची डिलिव्हरी करत होता.(Theft : नशा करण्यासाठी पैसे नसल्याने निवडला चोरीचा मार्ग, Mumbai पोलिसांना कळताच केली तुरूंगात रवानगी)
Tweet:
समीर वानखेडे यांनी असे म्हटले आहे की, त्याचे ग्राहक उच्चभ्रु आहेत. त्यांच्या खासगी पार्टीसाठी अशा प्रकारचे केक तयार करुन तो त्यांना देत असे. एनसीबीने आता त्याच्या संपर्कात आणखी कोण होते याचा तपास करत आहेत. एनसीबीला याच्या घरातून 350 ग्रॅम अफिम आणि 1.07 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे.