Mumbai AC Local मध्ये बनावट तिकीट बनवून प्रवास करणार्‍याला AC ने पकडलं!

स्वतः वापर करून घरातील 11 अन्य लोकांना देखील ते दिले होते. रेल्वे प्रशासनाने त्याच्याकडून सुमारे48 हजारांची तिकीटं जप्त केली आहेत.

Arrest pixabay

21 वर्षीय तरूणाला एसी लोकलचं तिकीट (AC Local Ticket) बनावट करून प्रवास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव Aman Nakhrani आहे तो पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करत होता. चर्चगेट- बोरिवली ट्रेन मध्ये प्रवास करताना तो वांद्रे स्थानकामध्ये चढला. नियमित तिकीट तपासणी मध्ये जेव्हा तो तपासनिकासमोर आला तेव्हा त्याने यूटीएस (UTS) वर तिकीट दाखवलं. तेव्हाच तपासनिकाला (TC) काहीतरी चूकीचं असल्याचा अंदाज आला. टीसीने त्याला यूटीएस अ‍ॅप ओपन सुरू करून सीझन पास दाखवण्यास सांगितलं. तेव्हा त्याने पास दुसर्‍याच फोन मध्ये आहे आणि त्रैमासिक पासचा फोटो आपल्याकडे असल्याचं सांगितलं.

टीसीने त्या प्रवाशाला अशाप्रकारे प्रवास करणं योग्य नसल्याचं सांगत यासाठी फाईन देखील भरावा लागणार असल्याचं सांगितलं.

यूटीएस तिकीटावर एक बारकोड असतो तो केवळ टीसीलाच समजतो. त्याच्या द्वारा कंट्रोल रूमला क्रॉस चेक करण्याची परवानगी असते. जेव्हा या प्रवाशासोबत असं करण्यात आलं तेव्हा बारकोड वर भलत्याच रुटची माहिती होती असं समोर आलं आहे. नक्की वाचा: Mumbai Ac Local: मुंबईत दरवाजा उघडा ठेवून धावली एसी लोकल, तांत्रिक बिघाडानंतर सेवा रद्द (व्हिडिओ पहा) .

प्रथम दर्शनी प्रवाशाने काही सॉफ्टवेअरचा वापर करून यूटीएस तिकीट क्रॉप केले होते. या प्रकारानंतर त्या प्रवाशाला रेल्वे पोलिसाकडे नेण्यात आले. पुढे त्याची अधिक तपासणी केल्यानंतर आपला गुन्हा त्याने कबुल केला. हा प्रकार तो सप्टेंबर 2022 पासून चर्चगेट-विरार मार्गावर करत असल्याचं म्हटलं आहे.

Nakhrani ने अशाप्रकारचे बनावट यापूर्वीही अनेकदा वापरले आहेत. स्वतः वापर करून घरातील 11 अन्य लोकांना देखील ते दिले होते. रेल्वे प्रशासनाने त्याच्याकडून सुमारे48 हजारांची तिकीटं जप्त केली आहेत.

आरोपीला अंधेरी जीआरपी कडे सोपवण्यात आले आहे. पोलिसांनी FIR दाखल करून विविध कलमांतर्गत आरोपीला अटक केली आहे.