मुंबई: क्रिकेटर सचिन तेंडुलकर च्या हस्ते सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये Plasma Donation Center चं उद्धघाटन; Corona Survivor ना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन
दरम्यान यामध्ये प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचा समावेश आहे.
भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आज (8 जुलै) मुंबईमध्ये प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं (Plasma Donation Center) उद्धाटन केले आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये (Seven Hills Hospital) हे प्लाझ्मा सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या प्रसंगी मीडियाशी बोलताना, ' कोरोनावर मात केलेल्या रूग्णांनी प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करण्याकरिता पुढे यावे. एक भारतीय दुसर्या भारतीयाच्या मदतीसाठी पुढे येणं यापेक्षा सध्या दुसरी कोणतीच मोठी मदत नाही.' असेही तो म्हणाला. सध्या अत्यावस्थ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या जीवाचा धोका कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वापरली जात आहे. अद्याप जगभरात कोविड 19 वर कोणतेच ठोस औषध, लस नसल्याने अनेकांसाठी प्लाझ्मा थेरपी जीवदान ठरत आहे. Plasma Therapy: कोरोना मुक्त झाल्यावर किती दिवसांनी करता येणार प्लाझ्मा दान, जाणून घ्या.
दरम्यान कोविड 19 वर मात केल्यानंतर रूग्णाच्या शरीरात तयार होणार्या अॅन्टी बॉडीज काढल्या जातात. रक्तदानामधून प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि अत्यावस्थ रूग्णाला तो चढवला जातो. दरम्यान यासाठी ICMR ची कडक नियमावली आहे. त्याच्या अखत्यारिमध्ये राहूनच हॉस्पिटलला ही प्लाझ्मा थेरपीची मुभा देण्यात आली आहे. आता दिवसागणिक मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातही कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोनावर मात करून घरी परतणार्या रूग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ANI Tweet
दरम्यान महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ‘प्रोजेक्ट प्लॅटिना' या प्लाझ्मा थेरपी उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचा समावेश आहे. या प्रोजेक्टद्वारा उपचार पद्धतीचा सर्वंकष विकास व वापर करून आणि संकलित होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून कोविड विषाणूचे औषध व लस शोधण्यासाठी मोठी मदत होणाार असल्याचं सांगण्यात आले आहे.