पुणेकरांंसाठी मोठी बातमी! बोरिवली-पुणे बस आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गे चालवण्याचा एसटी मंडळाचा विचार
मीडीया रिपोर्ट्सनुसार, एस टी महामंडळ याबाबत मुंबई विमानतळ प्राधिकरणासोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांची सोय होणार आहे.
मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) पुण्याला प्रवास कराणार्यांची संख्या पाहता आता एसटी महामंडळ प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आता बोरिवली - पुणे (Borivali-Pune) वातानुकुलित बस आता मुंबई विमानतळ मार्गे चालवली जाण्यसाठी चाचपणी सुरू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, एस टी महामंडळ याबाबत मुंबई विमानतळ प्राधिकरणासोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांची सोय होणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी 4 नोव्हेंबर ते 28 मार्च पर्यंत बंद; विमान तिकीट महागण्याची शक्यता.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क सोबत परदेशात सुट्ट्यांसाठी जाणार्या अनेकांना मुंबई विमानतळावरून थेट फ्लाईट्स आहेत. त्यामुळे पहाटे लवकर किंवा रात्री उशिरा येणार्यांना खासगी टॅक्सीची मदत घ्यावी लागते. मात्र आता एसी बसची सोय झाल्यास मोठी लूट रोखण्यास मदत होणार आहे.
शिवशाही, शिवनेरी सारख्या वातानुकुलित मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला येथून पुण्यासाठी गाड्या सुटतात. आता या बसमधील काही गाड्या राष्ट्रीय मुंबई विमानतळाशी जोडल्या जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी बंगलोर विमानतळावर महानगर वाहतूक महामंडळाने 'वायू वज्रा' ही वातानुकूलित बस सुरू केली आहे. त्याच धर्तीवर आता मुंबई विमानतळावर बससेवा सुरू करण्याचा विचार करत आहेत.
काही वर्षांपूर्वी दापोली-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी एसटीसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ती रद्द झाली. आता बोरिवली पुणे दरम्यान दिवसभरात चालवल्या जाणार्या 12 बसच्या फेर्यांपैकी काही एअरपोर्ट मार्गे चालवल्या जाण्याचा विचार सुरू आहे.