MSRTC Recruitment 2019: ST मध्ये 3606 नव्या जागांसाठी भरतीची घोषणा; 10% सवर्ण आरक्षणाचा फायदा घेत जाणून घ्या कसा आणि कुठे कराल अर्ज?

MSRTC कडून काही दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरतीची घोषणा केल्यानंतर आता एसटी महामंडळाने उरलेल्या नऊ जिल्ह्यांमध्येही 3606 चालक आणि वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे.

MSRTC Job Opening |Representational Image | Photo Credits : commons.wikimedia

MSRTC Mega Bharti 2019: MSRTC कडून काही दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरतीची घोषणा केल्यानंतर आता एसटी महामंडळाने उरलेल्या नऊ जिल्ह्यांमध्येही 3606 चालक आणि वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे. कोल्हापूर (Kolhapur), सांगली(Sangli) आणि सातारा(Satara)  जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. सर्वाधिक जागा नागपूर शहरामध्ये आहे. MSRTC Mega Bharti 2019: ST मध्ये 4416 पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा आणि कुठे कराल अर्ज?

विभागनिहाय पहा कुठे, किती होणार नोकर भरती?

1 अहमदनगर -56

2 सातारा -514

3 सांगली -761

4 कोल्हापूर- 383

5 नागपूर -865

6 चंद्रपूर- 170

7 भंडारा- 407

8 गडचिरोली -182

9 वर्धा- 268

एकूण जागा - 3606

शैक्षणिक पात्रता:

10 वी उत्तीर्ण , अवजड वाहन चालक परवाना , RTO चा चालक बिल्ला/वाहक बिल्ला, 03 वर्षे अनुभव

शारीरिक पात्रता:

उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.

दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.

रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

वयाची अट:

06 फेब्रुवारी 2019 रोजी 24 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

प्रवेश फी:

खुला प्रवर्ग: ₹600 आणि मागासवर्गीय/दुष्काळग्रस्त भाग:₹300 असेल. या नोकर भरती दरम्यान नुकतेच सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या 10% सवर्ण आरक्षणाचाही फायदा घेता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2019 असेल. अधिक माहितीसाठी www.msrtc.gov.in आणि msrtcexam.in या संकेतस्थळाला नक्की भेट द्या.