MPSC SEBC Reservation: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता विशेष आरक्षणासाठी उमेदवारांनी कधी करायचाय ऑनलाईन अर्ज?
यासाठी उमेदवारांनी 5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध पदांसाठी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता विशेष आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता विशेष आरक्षण देण्यात आले आहे. यानुसार, 4 विशेष विभागांकडे हे आरक्षण ठेवण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांनी 5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
यामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 यामध्ये हे आरक्षण देण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- 10th And 12th Board Exams: दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली 'अशी' माहिती
यासाठी उमेदवारांनी 5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 ला रात्री 12 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा केलेल्या उमेदवाराने अराखीव (खुला) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे याबाबत विकल्प देणे आवश्यक आहे. तसेच यात खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा विहित कालावधीत सादर न करणा-या उमेदवारांचा फक्त खुला पदावरील निवडीकरता विचार करण्यात येईल.
तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील आरक्षणासाठी पाक्ष ठरणार नाही. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीत अर्ज न भरल्यास व त्यात आवश्यक ते बदल न केल्यास त्यानंतर बदलाबाबत विनंती न केल्यास ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.